शाळेविषयी माहिती :
भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय आदर्श जिल्हा परिषद शाळा (वाडेगाव)
शाळेची ओळख :
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जि.प.आंतरराष्ट्रीय शाळा, वाडेगांव (मुले) ही शाळा ह्या विभागातील सर्वांत जुनी शाळा आहे.ह्या शाळेची स्थापना ब्रिटीशकाळात सन १८६९ साली झाली. सुरुवातीला ह्या शाळेला बुनियादी शाळा किंवा बेसिक शाळा असे संबोधण्यात येत असे मात्र ८ मार्च २०१९ साली महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा बहुमूल्य असा आंतरराष्ट्रीय शाळेचा बहुमान ह्या शाळेला प्राप्त झाला.तसे पाहता ह्या शाळेचा नावलौकिक पूर्वीपासूनच चांगला आहे मात्र उत्तरोत्तर शाळेच्या प्रगतीची वाटचाल सुरूच आहे.सन २०२० साली ‘माॅडेल शाळा’ म्हणूनही ह्या शाळेची निवड करण्यात आली आहे.आज सगळीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या तुलनेत मराठी माध्यमाच्या शाळांतील पटसंख्या कमी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत असताना ह्या शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
सन जुलै २०१९ पासून ह्या शाळेने पुर्व प्राथमिक वर्ग सुरू केले आहेत व त्याला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे राहू नये म्हणून या शाळेने ‘सेमी इंग्रजी’ माध्यमाचा अंगीकार केला आहे. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करण्याच्या उदात्त हेतूने ज्ञानदानाचे अखंड व्रत स्वीकारलेल्या ह्या शाळेने इतर इंग्रजी माध्यमाच्या तुलनेत आपले स्थान आजही टिकवून ठेवले आहे.’मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ ह्या अभियानाअंतर्गत शाळेने तालुक्यातून प्रथम क्रमांकमिळवून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त करून शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
शाळेची विशेषता :
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळेतील शिक्षक सतत कटिबद्ध असतात.येथील शिक्षक उच्चविद्याविभूषित असून मुख्याध्यापक व नऊ शिक्षकांचे मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे १० दिवसांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण झालेले आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जि.प.आंतरराष्ट्रीय शाळा वाडेगांव मुले ही शाळा जिल्ह्यातील पहिली डिजीटल शाळा असून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान देण्याच्या दृष्टीने शाळेतील सर्व वर्गखोल्या डिजीटल करण्यात आलेल्या आहेत.शाळेमध्ये चार प्रोजेक्टर बसविण्यात आले आहेत त्यासाठी वाय-फाय सुविधा उपलब्ध असून विद्यार्थ्यांसाठी व्हर्चुअल क्लासरुम सुद्धा उपलब्ध आहे.शाळेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शालेय परिसरामध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत.
विद्यार्थ्यांचे मन शालेय परिसरात रमविण्याच्यादृष्टीने शालेय परिसर चाईल्ड फ्रेन्डली तसेच संपूर्ण शालेय इमारतीची रंगरंगोटी करून बोलक्या भिंती उभारण्यात आलेल्या आहेत. शालेय परिसरात शालेय परसबागनिर्मिती करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहावे म्हणून शाळेत जलशुद्धीकरणकेंद्र सुद्धा तयार केले आहे.किशोरवयीन मुलींसाठी ‘सॅनिटरी नॅपकीन’ वेन्डीग मशीन बसविलेले आहे.विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी शाळेमध्ये अटल प्रयोगशाळा तयार करण्यात आलेली आहे.दैनंदिन परिपाठातर्गंत अद्ययावत साउंड सिस्टीमचा वापर करण्यात येतो. ह्याशिवाय वर्षभर विविध सहशालेय उपक्रम आणि सांस्कृतिक कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.सलग दोन वर्षांपासून शाळा तालुकास्तरीय चॅम्पियनशिल्ड मिळवत आहे.
शाळेला प्राप्त पुरस्कार :
आदर्श शाळा पुरस्कार
८ मार्च २०१९
जिल्ह्यातील चार आदर्श शाळांपैकी एक आदर्श शाळा म्हणून आंतरराष्ट्रीय शाळा बहुमान.
राज्यस्तरीय सर्वांग सुंदर शाळा पुरस्कार
३१ मार्च २०१९
राज्यस्तरीय सर्वांग सुंदर शाळा राज्य पुरस्कार.
कृतिशील शाळा पुरस्कार
५ सप्टेंबर २०१९
मा.राज्यमंत्री रणजित पाटील यांचे हस्ते कृतिशील शाळा पुरस्कार.
"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" तालुकास्तरीय प्रथम शाळा बहुमान
फेब्रुवारी २०२४
“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” तालुकास्तरीय प्रथम शाळा बहुमान
"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" जिल्हास्तरीय प्रथम शाळा बहुमान
फेब्रुवारी २०२४
“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” जिल्हास्तरीय प्रथम शाळा बहुमान
शाळेत साजरे केले जाणारे उपक्रम आणि कार्यक्रम :
परिपाठ
शाळेमध्ये मराठी, इंग्रजी ,हिंदी भाषांमधून विद्यार्थी, संगीत वाद्यासह परिपाठ सादर करतात, दररोज वर्ग ३ ते ८ चे विद्यार्थी पाळी पाळींने परिपाठ सादर करतात.
क्रीडा स्पर्धा
शाळेमध्ये इंटर हाऊसेस स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यामध्ये देशी खेळ सोबतच मैदानी खेळ व आंतरराष्ट्रीय खेळ सुद्धा खे मिळविले जातात.
कृती युक्त पाढे पाठांतर
विद्यार्थ्यांना पाढे पाठ करण्याचा कंटाळा येऊ नये म्हणून कृतीयुक्त पाढे पाठ करण्यावर भर दिला जातो.
वाढदिवसानिमित्त शाळेत पुस्तक भेट देणे
शाळेमध्ये पूर्वी वाढदिवसानिमित्त मुले चॉकलेट वाटायची तो उपक्रम बंद करून वाढदिवसाच्या दिवशी शाळेत एक पुस्तक भेट देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
दररोज इंग्रजी वाक्य तयार करणे
विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची गोडी निर्माण व्हावी व भीती दूर होण्याकरिता दररोज एका प्रकारावर इंग्रजी वाक्य तयार करण्याचा उपक्रम परिपाठामध्ये घेतला जातो.
श्यामच्या आईचे क्रमशः वाचन
विद्यार्थ्यांना संस्काराचे मोल समजण्याकरिता श्यामची आई पुस्तकांमधील कथांचे दररोज क्रमशः वाचन घेतले जाते.
शैक्षणिक सहल
दरवर्षी विद्यार्थ्यांना निसर्गरम्य, ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याकरिता व माहिती मिळवण्याकरिता सहलीचे आयोजन केले जाते.
परिसरातील लघु उद्योगास भेट
कार्यानुभव विषयांतर्गत परिसरातील लघु उद्योगा विषयी माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी लघु उद्योगास भेट दिली जाते.
लता मंगेशकर गीतमंच
विद्यार्थ्यांना संगीत व कलेची आवड निर्माण व्हावी तसेच विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी लता मंगेशकर संगीत मंचाची स्थापना करण्यात आली आहे.
आमचे कला दालन
विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये बनवलेल्या कार्यानुभव कला तसेच सण उत्सवा संबंधी वस्तूचे शाळेमध्ये निर्माण केलेल्या कलादालनामध्ये प्रदर्शन भरविण्यात येते.
विणकाम
कार्यानुभव मधील उत्पादक उत्प्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बिनकामाचे धडे देऊन विविध विणकाम शिकविल्या जाते.
पेपर आर्ट
विविध पेपर पासून विविध आकार, वस्तु बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना पेपर आर्टचे प्रशिक्षण दिले जाते.
बाल आनंद मेळावा
दरवर्षी 25 जानेवारीला बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते यामध्ये विद्यार्थी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून त्यामध्ये खरी कमाईचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे यासाठी हा उपक्रम शाळेमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
सामान्य ज्ञानाची दहीहंडी
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान अध्यावत असणे आवश्यक आहे याकरिता शाळेमध्ये सामान्य ज्ञानाची दहीहंडी चे आयोजन करण्यात येऊन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांची स्पर्धा आयोजित केली जाते.
गोकुळाष्टमी
शाळेमध्ये दरवर्षी गोकुळाष्टमीला गोकुळाष्टमीचा उत्साह फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो शाळेतील निवडक मुले कृष्णा राधेच्या वेशामध्ये येऊन दहीहंडी फोडण्याचा व गोपाळकाल्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
मी वाचू शकतो
या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये भिंतीवरील रंगरंगोटी काम केलेल्या बोलक्या भिंती वरील शालेय माहिती इंग्रजी व मराठी भाषेतून विद्यार्थी चांगल्या आत्मविश्वासाने वाचू शकतो.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
शाळेमध्ये शाळा स्तरावरील आयोजित होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा विषयीचे मार्गदर्शन कॅम्प आयोजित केले जाते यामध्ये नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, मंथन परीक्षा,NMMS परिक्षा
रंगभरण स्पर्धा
विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त रंगभरण स्पर्धांचे आयोजन व बक्षीस वितरण केले जाते.
विद्यार्थी बचत बँक
विद्यार्थ्यांना बचतीचे महत्त्व समजावे यासाठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची बचत बँक निर्माण करून विद्यार्थी स्वतः त्या बँकेमध्ये पैसे भरने, पैसे काढणे व हिशोब ठेवणे इत्यादी सर्व व्यवहार स्वतः करतात.
विविध कसरती साठी समर कॅम्प
विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी जय बजरंग व्यायाम शाळा वाडेगाव व शाळेच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी सुट्टीमध्ये समर कॅम्प आयोजित केला जातो यामध्ये विद्यार्थ्यांना मल्लखांब , लाठी काठी व इतर कसरतीचे धडे दिले जातात.
शिक्षकवृंद आणि इतर कर्मचारी :
श्री. समाधान विठोबा सोर
- पद : मुख्याध्यापक
- शैक्षणिक पात्रता : एम.ए. बी.एड
छाया सुधाकर काळबांडे
- पद : सहाय्यक शिक्षिका
- शैक्षणिक पात्रता : B.A. DEd.
प्रणिता सुधाकरराव डंबाळे
- पद :सहाय्यक शिक्षिका
- शैक्षणिक पात्रता : M.A B. Ed.
अर्चना गोमाशे
- पद : सहाय्यक शिक्षिका
- शैक्षणिक पात्रता : B.A. DEd.
फारुक रऊफ कुरेशी
- पद : पदवीधर शिक्षक
- शैक्षणिक पात्रता : BSc. BEd.
मंदा चंदू चव्हाण
- पद : सहाय्यक शिक्षिका
- शैक्षणिक पात्रता : M.A. D.Ed
संगीता नामदेव हाडोळे
- पद : सहाय्यक शिक्षिका
- शैक्षणिक पात्रता : B.A. D.Ed
ज्ञानेश्वर पुंडलिक पुंडकर
- पद : सहाय्यक शिक्षक
- शैक्षणिक पात्रता : B.A. D.Ed
योगिता मारोतराव खोपे
- पद : विषय शिक्षिका
- शैक्षणिक पात्रता : BSc. BEd.
सोनल गोविंदराव देशमुख
- पद : सहाय्यक शिक्षिका
- शैक्षणिक पात्रता : M.A. D.Ed
प्रिया उज्वल सोळंके
- पद : सहायक शिक्षिका
- शैक्षणिक पात्रता : B.A. D.Ed
साधना गोपाळ गोतमारे
- पद : सहायक शिक्षिका
- शैक्षणिक पात्रता : B.A. D.Ed
अनुराधा योगेश शेंडे
- पद : विषय शिक्षिका
- शैक्षणिक पात्रता : B. A. BEd.
ज्योती शांताराम राठोड
- पद : सहाय्यक शिक्षिका
- शैक्षणिक पात्रता : B.A. D.Ed
गजानन पांडुरंग करंगळे
- पद : विषय शिक्षक (सामाजिक शास्त्र)
- शैक्षणिक पात्रता : B.Ed
सुरेश गोविंदराव कातखेडे
- पद : पदवीधर शिक्षक (भाषा)
- शैक्षणिक पात्रता : M.A. B.Ed
रामदास देवराव वाघ
- पद : सहाय्यक अध्यापक
- शैक्षणिक पात्रता : B. A. BEd.
विवेकानंद मि. वाकोडे
- पद : पूर्व प्राथमिक शिक्षक
- शैक्षणिक पात्रता : B.Com, B.A. Bped.
प्रियंका प्रल्हाद वाढोकार
- पद : पूर्व प्राथमिक शिक्षिका
- शैक्षणिक पात्रता : B. A., D.Ed., B.Ed.
ममता सुभाषराव उमाळे
- पद : पूर्व प्राथमिक शिक्षिका
- शैक्षणिक पात्रता : B.A. B.Ed
स्वाती तानाजी घाटोळ
- पद : पूर्व प्राथमिक शिक्षिका
- शैक्षणिक पात्रता : B. A. BEd., M. A. English
जयश्री गजानन मोंडोकार
- पद : पूर्व प्राथमिक शिक्षिका
- शैक्षणिक पात्रता : बी.ए. डी.एड., सी.टि.सी
वृषाली तानाजी धनोकार
- पद : – पूर्व प्राथमिक शिक्षिका
- शैक्षणिक पात्रता : बीए बीएड
गजानन भाऊराव कातखेडे
- पद : सहाय्यक शिक्षक
- शैक्षणिक पात्रता : B.A. D.Ed
रजनी भाऊराव फाटे
- पद : सहाय्यक शिक्षिका
- शैक्षणिक पात्रता : B.A. D.Ed
राजेश गुलाबराव मसने
- पद : सहाय्यक शिक्षक
- शैक्षणिक पात्रता : एम.ए. , बी.एड.
गजेंद्र दामोदर जढाळ
- पद : – सहाय्यक शिक्षक
- शैक्षणिक पात्रता : एम. ए., डी. एड
अनिल जगन्नाथ धोत्रे
- पद : सहाय्यक शिक्षक
- शैक्षणिक पात्रता :
बी.ए. डी.एड
सुभाष मानाजी शिरसाट
- पद : – सहाय्यक शिक्षक
- शैक्षणिक पात्रता : बी.ए.बी.एड