भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय आदर्श जिल्हा परिषद शाळा वाडेगाव (मुले)

यांच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.

शाळेविषयी माहिती :

                     भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जि.प.आंतरराष्ट्रीय शाळा, वाडेगांव (मुले) ही शाळा ह्या विभागातील सर्वांत जुनी शाळा आहे.ह्या शाळेची स्थापना ब्रिटीशकाळात सन १८६९ साली झाली. सुरुवातीला ह्या शाळेला बुनियादी शाळा किंवा बेसिक शाळा असे संबोधण्यात येत असे मात्र ८ मार्च २०१९ साली महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा बहुमूल्य असा आंतरराष्ट्रीय शाळेचा बहुमान ह्या शाळेला प्राप्त झाला.तसे पाहता ह्या शाळेचा नावलौकिक पूर्वीपासूनच चांगला आहे मात्र उत्तरोत्तर शाळेच्या प्रगतीची वाटचाल सुरूच आहे.सन २०२० साली ‘माॅडेल शाळा’ म्हणूनही ह्या शाळेची निवड करण्यात आली आहे.आज सगळीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या तुलनेत मराठी माध्यमाच्या शाळांतील पटसंख्या कमी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत असताना ह्या शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.सन जुलै २०१९ पासून ह्या शाळेने पुर्व प्राथमिक वर्ग सुरू केले आहेत व त्याला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे राहू नये म्हणून या शाळेने ‘सेमी इंग्रजी’ माध्यमाचा अंगीकार केला आहे. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करण्याच्या उदात्त हेतूने ज्ञानदानाचे अखंड व्रत स्वीकारलेल्या ह्या शाळेने इतर इंग्रजी माध्यमाच्या तुलनेत आपले स्थान आजही टिकवून ठेवले आहे.’मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ ह्या अभियानाअंतर्गत शाळेने तालुक्यातून प्रथम क्रमांकमिळवून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त करून शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

शाळेची विशेषता :

                    विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळेतील शिक्षक सतत कटिबद्ध असतात.येथील शिक्षक उच्चविद्याविभूषित असून मुख्याध्यापक व नऊ शिक्षकांचे मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे १० दिवसांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण झालेले आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जि.प.आंतरराष्ट्रीय शाळा वाडेगांव मुले ही शाळा जिल्ह्यातील पहिली डिजीटल शाळा असून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान देण्याच्या दृष्टीने शाळेतील सर्व वर्गखोल्या डिजीटल करण्यात आलेल्या आहेत.शाळेमध्ये चार प्रोजेक्टर बसविण्यात आले आहेत त्यासाठी वाय-फाय सुविधा उपलब्ध असून विद्यार्थ्यांसाठी व्हर्चुअल क्लासरुम सुद्धा उपलब्ध आहे.शाळेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शालेय परिसरामध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत.

                  विद्यार्थ्यांचे मन शालेय परिसरात रमविण्याच्यादृष्टीने शालेय परिसर चाईल्ड फ्रेन्डली तसेच संपूर्ण शालेय इमारतीची रंगरंगोटी करून बोलक्या भिंती उभारण्यात आलेल्या आहेत. शालेय परिसरात शालेय परसबागनिर्मिती करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहावे म्हणून शाळेत जलशुद्धीकरणकेंद्र सुद्धा तयार केले आहे.किशोरवयीन मुलींसाठी ‘सॅनिटरी नॅपकीन’ वेन्डीग मशीन बसविलेले आहे.विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी शाळेमध्ये अटल प्रयोगशाळा तयार करण्यात आलेली आहे.दैनंदिन परिपाठातर्गंत अद्ययावत साउंड सिस्टीमचा वापर करण्यात येतो. ह्याशिवाय वर्षभर विविध सहशालेय उपक्रम आणि सांस्कृतिक कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.सलग दोन वर्षांपासून शाळा तालुकास्तरीय चॅम्पियनशिल्ड मिळवत आहे.

शाळेला प्राप्त पुरस्कार :

आदर्श शाळा पुरस्कार

८ मार्च २०१९

जिल्ह्यातील चार आदर्श शाळांपैकी एक आदर्श शाळा म्हणून आंतरराष्ट्रीय शाळा बहुमान.

राज्यस्तरीय सर्वांग सुंदर शाळा पुरस्कार

३१ मार्च २०१९

राज्यस्तरीय सर्वांग सुंदर शाळा राज्य पुरस्कार.

कृतिशील शाळा पुरस्कार

५ सप्टेंबर २०१९

मा.राज्यमंत्री रणजित पाटील यांचे हस्ते कृतिशील शाळा पुरस्कार.

"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" तालुकास्तरीय प्रथम शाळा बहुमान

फेब्रुवारी २०२४
“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” तालुकास्तरीय प्रथम शाळा बहुमान

"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा"  जिल्हास्तरीय प्रथम शाळा बहुमान

फेब्रुवारी २०२४
“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा”  जिल्हास्तरीय प्रथम शाळा बहुमान

मातृभाषेतील शिक्षण हेच खरे शिक्षण.

शिक्षणात मातृभाषेमुळे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. मातृभाषा ही संस्काराचा आणि संस्कृतीचा मानबिंदू आहे. जितक्या सहजतेने मूल मातृभाषेतून शिकते तितक्या सहजतेने इंग्रजीतून शिकत नाही म्हणून मातृभाषेतून शिक्षण हेच खरे शिक्षण आहे.

इंग्लंड, अमेरिका, फ्रांस, जर्मनी, चीन, जपान, रशिया यासारख्या प्रगत देशातही मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते. या देशातील पालक जाणीवपूर्वक आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देतात. फिनलँड सारखा देश की ज्या देशाच्या शिक्षण पद्धतीचे अनुकरण प्रगत राष्ट्रही करतात त्या देशातही मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर मुलांना इंग्रजीचे डोस पाजले तर इथला मराठी भाषेचा समृद्ध ठेवा लुप्त होईल. मुलांमध्ये, राष्ट्राभिमान, राष्ट्रीय एकात्मता, चांगल्या संस्काराचे रोपण करायला मातृभाषाच कामी येईल.

“मराठी माध्यमातील शाळांमध्ये स्थानिक संस्कृती, भाषा आणि साहित्याचा महत्त्वपूर्ण अभ्यास मिळतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांची सामाजिक आणि सांस्कृतिक परिपेक्षितता वाढते.”

आमचे सह-अभ्यासक्रम उपक्रम

अवांतर वाचन आणि साहित्य
शैक्षणिक सहल
प्रश्नमंजुषा आणि अभ्यासक्रम स्पर्धा
हंगामी क्रिडा स्पर्धा
शैक्षणिक प्रकल्प आणि ज्ञान
कलागौरव उत्सव (नृत्य, गायन, अभिनय)

शाळेतील उपक्रम, कार्यक्रम आणि इतर माहिती

शाळेची छायाचित्रे :